शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 05:15 IST

मानेवरचा वार त्यांनी हातावर घेतल्याने हाताची नस कापली गेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. प्रताप अडसड यांची भगिनी अर्चना रोठे (४५) यांच्यावर चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला.

मानेवरचा वार त्यांनी हातावर घेतल्याने हाताची नस कापली गेली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. त्यांच्या वाहनाची समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर रात्रीच्या अंधारात पसार झाले.

अपक्ष उमेदवारावर गोळीबार

जळगाव : जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन शेख (५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी सोमवारी पहाटे गोळीबार केला. यावेळी तीन राउंड फायर करण्यात आले. या घटनेत शेख यांच्या घराच्या खिडकीची काच फुटली असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी काडतूसच्या दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या. 

पहाटे ३:५४ वाजता झाडली गोळी : पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३:४२ वाजता घराजवळ एक दुचाकी दिसत आहे. त्यानंतर पहाटे ३:५४ वाजता गोळी झाडण्यात आल्याचे फुटेजमध्ये दिसते.

प्रचाराची रिक्षा फोडली 

धुळे ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राघवेंद्र उर्फ राम मनोहर पाटील यांच्या प्रचारार्थ लावलेल्या रिक्षाची काच फोडण्यात आली. तसेच बॅनर फाडून डिझेलच्या टाकीत चहा पावडर व साखर टाकल्याची घटना घडली. मोहाडी पोलिसांत कलम ४२७ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

वाहनावर दगडफेक; उमेदवार जखमी 

गंगापूर  (जि. छत्रपती संभाजीनगर) : गंगापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रा. सुरेश सोनवणे हे सोमवारी धामोरी बुद्रुक येथून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात सोनवणे जखमी झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावतीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी