शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 08:35 IST

ठाणे महापालिका हद्दीतील बीएसयूपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कापोटी केवळ १०० रुपये भरावे लागण्याचा सरकारचा निर्णय भाजपमुळे झाल्याचा दावा भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला. शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच मुद्रांक शुल्क कमी झाल्याचा दावा केला.

ठाणे महापालिका हद्दीतील बीएसयूपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कापोटी केवळ १०० रुपये भरावे लागण्याचा सरकारचा निर्णय भाजपमुळे झाल्याचा दावा भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला. शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच मुद्रांक शुल्क कमी झाल्याचा दावा केला. मित्रपक्षांमधील या दावे - प्रतिदाव्यांमुळे निवडणुकीच्या तोंडावरील श्रेयवादाच्या लढाईला तोंड फुटले आहे.

मुद्रांक शुल्क व नोंदणी करण्यासाठी लागणारा ५० हजार ते एक लाख ३४ हजारांपर्यतचा खर्च बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्यांना परवडणारा नव्हता. याबाबत आपण पाठपुरावा केल्याचा दावा आ. केळकर यांनी केला. त्यामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला, असे ते म्हणाले. त्यांच्याच पक्षातील कोपरीतील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनीही या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने कोपरी येथे राबविलेला बीएसयूपी प्रकल्प व शहर पुनर्विकास प्रकल्पाच्या इमारतीतील ८११ कुटुंबांच्या सदनिकांचा अखेर ५ वर्षांनंतर करारनामा यांनी होणार आहे. खा. नरेश म्हस्के यांनी या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे पाठपुरावा केल्याचा दावा केला.

प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय?

१) सिद्धार्थनगर (कोपरी), खारटन रोड, धर्मवीरनगर (तुळशीधाम), ब्रह्मांड (कोलशेत), कासारवडवली, टेकडी बंगला, महात्मा फुलेनगर (कळवा), कौसा, पडले व सागर्ली या ठिकाणचा विकास केंद्र, राज्य शासन व ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'जेएनएनयूआरएम'च्या, 'बीएसयूपी' योजनेंतर्गत झाला.

२) झोपडीमुक्त शहर आणि झोपडीधारकाला स्वतःचे झोपडपट्टीमुक्त शहर आणि हक्काचे घर मिळणे, हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेमार्फत या योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेले काही भूखंड सध्याच्या झोपडपट्ट्यांच्या जागी असून, तेथील नागरिकांचे पुनर्वसन 'बीएसयूपी' सदनिकांत केले. ३) या भागातील रहिवासी श्रमिक वर्गातील आहेत.त्यामुळे सदनिका करारनामा करण्यासाठी एक टक्के मेट्रो कर (सेस) व १ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) व नोंदणी मुद्रांक शुल्काचा अधिभार न परवडणारा असल्याने त्यांना शुल्कामध्ये सवलत देण्याची आग्रही मागणी शिंदेसेनेने केली व २०२२ पासून पाठपुरावा केला. याचे पुरावे खा. नरेश म्हस्के यांनी सादर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP, Shinde Sena clash over credit for stamp duty relief.

Web Summary : BJP and Shinde Sena are in a credit war over reduced stamp duty for BSUP home buyers. BJP claims credit, while Shinde Sena cites Eknath Shinde's efforts. The decision benefits thousands.
टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा