शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

"तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही", सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 20:09 IST

एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे.

MLA Disqualification Case Sushma Andhare : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकरांनी दिला आहे. तसेत भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या निकालानंतर शिवसेना(उबाठा) गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा आज अखेर निकाल लागला. अवघ्या राज्याचे लक्ष या निकालाकडे होते. आजच्या निकालात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे, तर एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या निकालांनंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आजच्या निकालानंतर शिवसेना नेत्या सुष्मा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, "तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही" , असा टोला त्यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजप, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे. 

ठाकरेंना कोर्टात जावं लागेल - शरद पवारसत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केले होते, त्यानुसारच हा निर्णय आला आहे. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचे दिसून आले. त्यामुळे, आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले. तर, व्हीप देण्याबाबात पक्ष संघटना महत्त्वाची, असे कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे, येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिली

आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार- उद्धव ठाकरेआजच्या निकालानंतर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवेणारे नार्वेकर कोण? नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालाय. नार्वेकर कोर्टालाही जुमानत नाहीत, हे या निकालावरुन सिद्ध झाले. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अवमानयाचिका दाखल करता येते का, ते आम्ही पाहणार आहोत. आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेRahul Narvekarराहुल नार्वेकरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभा