आमदार बच्चू कडूंची मंत्रालयीन कर्मचा-याला मारहाण

By Admin | Updated: March 29, 2016 16:36 IST2016-03-29T16:28:03+5:302016-03-29T16:36:56+5:30

आमदार बच्चू कडू यांनी यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे

MLA Bachu Kadoo assaulting employee employee | आमदार बच्चू कडूंची मंत्रालयीन कर्मचा-याला मारहाण

आमदार बच्चू कडूंची मंत्रालयीन कर्मचा-याला मारहाण

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २९ - आमदार बच्चू कडू यांनी यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या मारहाणीनंतर मंत्रालयाची कर्मचा-यांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केलं आहे. 
 
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या मारहाणीनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मारहाणीनंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी बच्चू कडू यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
 
छायाचित्र - सुशील कदम

Web Title: MLA Bachu Kadoo assaulting employee employee