मित्राच्या तान्हुलीचे अपहरण करणा-यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:36 IST2017-12-05T05:36:04+5:302017-12-05T05:36:15+5:30

५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणा-याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली...

Mitra's Tanhuli kidnapped life imprisonment | मित्राच्या तान्हुलीचे अपहरण करणा-यास जन्मठेप

मित्राच्या तान्हुलीचे अपहरण करणा-यास जन्मठेप

नागपूर : ५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणा-याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतुल अनंतराव काटे (४०) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून, तो गोव्यातील तलीगाव अराडीबंद
येथील रहिवासी आहे.
या प्रकरणात अतुलची पत्नी विशाखा (३४) हीसुद्धा आरोपी असून, ती खटला सुरू असतानाच फरार झाली होती. त्यामुळे तिला अटक होताच तिच्याविरुद्ध वेगळा खटला चालविण्यात येणार आहे. न्यायालयाने तिला फरार घोषित करून अटक करण्याचे  निर्देश पोलिसांना दिले आहेत.
सृष्टी मनोज वैरागडे असे अपहृत मुलीचे नाव असून, ती अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उल्हासनगरच्या श्रीधेनू कॉम्प्लेक्स येथील रहिवासी आहे. सृष्टीचे वडील मनोज आणि आरोपी अतुल काटे हे वर्गमित्र होते. २७ जून २०१४ रोजी दुपारी आरोपी काटे दाम्पत्य मनोज वैरागडे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी वैरागडे यांची पत्नी वंदना ही सृष्टीसोबत घरी होती. सृष्टीला फ्रॉक आणि खाऊ घेऊन देतो, असे वंदनाला सांगून आरोपी दाम्पत्य सृष्टीला सोबत घेऊन गेले. सायंकाळ होऊनही काटे दाम्पत्य सृष्टीला घेऊन परत न आल्याने वैरागडे कुटुंबाने त्यांचा शोध सुरू केला होता. काही वेळानंतर काटे दाम्पत्याने मनोजला मोबाइलवर फोन करून आणि एसएमएस पाठवून ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. ती जिवंत पाहिजे असेल तर आम्हाला ५० हजार रुपये पाठवा’, असे म्हटले होते. वंदना वैरागडे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६४ -ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी अपहृत मुलगी आणि अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ चार पथके तयार करून इतरत्र पाठविली होती. दरम्यान, मुलगी मिळावी म्हणून मनोज वैरागडे यांच्या एका मित्राने ३० हजार रुपये एसएमएसनुसार विशाखा काटे हिच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले होते. आरोपी दाम्पत्याने शेगाव, अकोला आणि अन्य एका ठिकाणाहून २५ हजार रुपये एटीएममधून काढून घेतले होते.

Web Title: Mitra's Tanhuli kidnapped life imprisonment