३० रुपयांसाठी मित्राची हत्या

By Admin | Updated: September 24, 2016 03:41 IST2016-09-24T03:41:46+5:302016-09-24T03:41:46+5:30

दारू आणण्यासाठी घेतलेल्या ३० रुपयांच्या वादातून एका माथेफिरूने मित्राची हत्या केल्याची घटना बोरीवलीमध्ये गुरुवारी रात्री घडली.

Mitra murdered for Rs 30 | ३० रुपयांसाठी मित्राची हत्या

३० रुपयांसाठी मित्राची हत्या


मुंबई : दारू आणण्यासाठी घेतलेल्या ३० रुपयांच्या वादातून एका माथेफिरूने मित्राची हत्या केल्याची घटना बोरीवलीमध्ये गुरुवारी रात्री घडली. या गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लाऊन बोरीवली पोलिसांनी माथेफिरू आरोपीला गजाआड केले आहे.
मृत व्यक्तीचे नाव खंडेराव उर्फ प्रवीण मोरेश्वर चिटणीस (५०) असे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डोक्यात वार करून चिटणीस यांची हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसले.
चिटणीस यांच्याकडून वसंत शेट्टी (५५) याने दारू आणण्यासाठी ३० रुपये घेतले होते. मात्र दारू न आणताच शेट्टी त्या पैशांची दारू प्यायला. चिटणीस यांनी त्याला जाब विचारताच दोघांमध्ये वाद होऊन शेट्टी याने त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी शेट्टीला अटक केली असून, न्यायालयाने २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Mitra murdered for Rs 30