पनवेलमधून बेपत्ता झालेला अडीच वर्षाचा साई पाटील सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 15:35 IST2018-03-17T15:35:08+5:302018-03-17T15:35:08+5:30
पेणधर गावातून गुरुवार (15 मार्च) संध्याकाळपासून बेपत्ता असलेला अडीच वर्षाचा साई रविंद्र पाटील हा सुखरूप मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पनवेलमधून बेपत्ता झालेला अडीच वर्षाचा साई पाटील सापडला
पनवेल : पेणधर गावातून गुरुवार (15 मार्च) संध्याकाळपासून बेपत्ता असलेला अडीच वर्षाचा साई रविंद्र पाटील हा सुखरूप मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तळोजा एमआयडीसीतील पुनिया कटर या कंपनीच्या मागे तो काही कामगारांना रडत असल्याचा दिसून आला. त्या कामगारांनी पेणधर मधील मोहन पाटील यांच्याशी संपर्क साधून त्या मुलाला घरच्यांकडे सुपूर्द केला.
पळस्पे गावातील असणारा साई रविंद्र पाटील आईसोबत पेणधर येथे मामाच्या घरी आला होता आणि गुरूवारीपासून बेपत्ता झाला होता. मोठ्या काळजीत असलेल्या कुटुंबीयांसह पेणधरमधील ग्रामस्थ आणि तळोजा पोलीस त्याचा शोध घेत होते. शनिवारी सकाळी हा मुलगा सापडल्यानं कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला आहे.