शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार! समुद्रात बुडून बेपत्ता झालेला तरुण नवव्या दिवशी जिवंत परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 19:28 IST

रविवारी 22 एप्रिल रोजी समुद्रात बुडून बेपत्ता झालेला एक तरुण नऊ दिवसानंतर सुखरूपपणे परतला आहे.

 - अमूलकुमार जैन

 रायगड -  मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात गेल्या रविवारी 22 एप्रिल रोजी बुडालेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावांतील 25 वर्षीय अमोल दिलीप पाटील हा तब्बल नवव्या दिवशी सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचला असल्याची माहिती मुरुड पोलिसांना प्राप्त झाली आहे. मात्र गेल्या रविवारी 22 एप्रिल रोजी नेमके काय झाले याचा तपास आता सुरु करण्यात आला असल्याची माहिती मुरुड पोलीस निरिक्षक किशोर साळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

अमोल दिलीप पाटील व त्याचा अहमदनगर जिल्ह्यातील सुगंधा येथील 26 वर्षीय मित्न सतिश ढोके हे दोघेही त्यांच्या पुढील शिक्षणीक प्रवेश प्रकियेसाठी पुणे येथे आले होते. प्रवेश प्रकिया झाल्यानंतर २२ एप्रिल २०१८ रोजी मुरूड तालुक्यातील मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी सकाळी साडे अकराच्या सुमारास ते एका मोटरसायकल वरु न आले होते. दुपारी दोन अडीच्या सुमारास काशिद समुद्रात ते पोहण्याकरीता उतरले. मात्न स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पाण्यात उतरण्यास मनाई केली असता त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि पाण्यात उतरले.

यावेळी अमोल पाटील याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो लाटेच्या पाण्यात दिसेनासा झाला. तेव्हा पासून भारतीय तटरक्षक दल, मुरुड पोलीस आणि स्थानिक जिवरक्षक ग्रामस्थांनी रविवार पासून त्याचा रायगड जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारी शोध घेत होते. अमोल पाटील काशिद समुद्रात बुडाल्या बाबत रायगडच्या किनारी भागातील सर्व पोलीस ठाणी व गावात सूचना देवून त्यांच्या माध्यमातूनही शोध मोहिम कार्यान्वित करण्यात आली होती.

मात्न सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  अमोल पाटील  हा सुखरूपपणे त्याच्या घरी परतला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी मुरूड पोलीस स्टेशनला संपर्क साधून सांगितले. अमोल पाटील हा त्याच्या घरी पोहचला असून तो मानिसक तणावाखाली आहे.त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करण्यास सांगितले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी सांगितले.

अमोल हा सुखरूप पणे घरी आला आहे.मात्न त्याची मानसिक स्थिती ही नाजूक आहे. घरी येताना तो जोरजोरात ओरडत आणि रडत घरी आला. सध्या त्याला घरात त्याला एका खोलीत ठेवले असून डॉक्टरांना उपचारासाठी घरी बोलविण्यात आले आहे.

-विद्याधर पाटील (अमोल पाटील यांचा चुलत भाऊ)

अमोल सुखरुप घरी पोहोचला हे चांगले आहे. परंतू गेले नऊ दिवस तो कोठे होता. गेल्या २२ एप्रिल रोजी तो काशिदच्या समुद्रात बुडाल्यावर तत्काळ शोध मोहिम सुरु करुनही तो सापडला नाही. त्याचे नातेवाईक देखील येथे येवून शोध घेत होते. या सर्व पाश्र्वभूमीवर त्याचा मित्र सतिश ढोके यास मुरुड पोलीस ठाण्यात उद्या बोलावले आहे. नेमके काय घडले यांचा तपास पूर्ण करणार आहे.

- किशोर साळे, मुरुड पोलीस निरिक्षक  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड