अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

By Admin | Updated: July 8, 2017 06:23 IST2017-07-08T06:23:10+5:302017-07-08T06:23:10+5:30

फिरायला नेण्याच्या बहाण्याने वडिलांच्या मित्रांसह चार जणांनी एका १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल २४ तास सामूहिक लैंगिक अत्याचार

Minor girl tortured by four | अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फिरायला नेण्याच्या बहाण्याने वडिलांच्या मित्रांसह चार जणांनी एका १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल २४ तास सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली. मुलीचे ट्रॉम्बे परिसरातून अपहरण झाले असल्याने या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपहरण, सामूहिक बलात्कार, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत मित्र आनंद कर्नपात्रे (३८) याच्यासह साई कृष्ण भट्टी (१९), कार्तिक तेवर (२०) या तिघांना बेड्या ठोकत चौथा आरोपी भरत ओव्हाळचा शोध पोलीस घेत आहेत.
मानखुर्द परिसरातील १५ वर्षांची मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. तिचे वडील गारमेंटमध्ये काम करतात. आरोपी आनंदही गारमेंटमध्ये काम करत असून, तिच्या वडिलांचा मित्र आहे. बुधवारी दुपारी २ वाजता आनंदने मुलीला सोबत फिरायला नेतो असे तिच्या वडिलांना सांगितले. कुटुंबीयांनीही त्याला परवानगी दिली. दुपारी अडीच वाजता मुलीला घेऊन तो रिक्षाने भांडुपमधील साईच्या घरी आला. मुलीला खोलीत डांबून त्याने त्याचे अन्य दोन मित्र कार्तिक आणि भरतलाही बोलावून घेतले. चौघांनीही नशा केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केले. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी आनंदला फोन केला असता त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी रात्री उशिराने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरू होते. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता तिला याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत आरोपींनी भांडुप येथील महाराष्ट्रनगर येथे सोडले.

Web Title: Minor girl tortured by four