अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: August 2, 2023 12:26 IST2014-05-13T23:24:55+5:302023-08-02T12:26:38+5:30

अल्पवयीन मुलीला फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी अकोले पोलिसांनी मंगळवारी पहाटे दोघा आरोपींना अटक केली.

Minor girl tortured | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 अकोले : अल्पवयीन मुलीला फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी अकोले पोलिसांनी मंगळवारी पहाटे दोघा आरोपींना अटक केली. याबाबतची माहिती अशी की, सचिन अरविंद शिंदे (वय २४, रा. धुमाळवाडी) व गुलाब दत्तात्रय वाळुंज (वय २६, रा. औरंगपूर) या दोघा सज्ञान आरोपींनी शहरानजिक एका झोपडीत राहत असलेल्या १७ वर्षांच्या मुलीवर १० मे रोजी अकोले, शिर्डी येथे लॉजवर नेऊन अत्याचार केला. दोघा आरोपींनी पिडीत मुलीस बळजबरीने दमदाटी करुन स्वत:च्या मालकीच्या इंडिका गाडीतून शिर्डी येथे एका लॉजवर नेऊन अनेक वेळा अत्याचार केला. दुसर्‍या आरोपीने पिडीत मुलीचा गाडीमधे विनयभंग केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Minor girl tortured