अल्पवयीन मुलीवर शाळेतल्याच दहा मुलांनी केला अत्याचार
By Admin | Updated: March 1, 2017 19:47 IST2017-03-01T19:24:23+5:302017-03-01T19:47:10+5:30
अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतल्या दहा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत...

अल्पवयीन मुलीवर शाळेतल्याच दहा मुलांनी केला अत्याचार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - अल्पवयीन मुलीवर तिच्याच शाळेतल्या दहा अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंधेरी येथून पोलिसांनी दहा अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या दहा जणांचे वय 15-16च्या दरम्यान आहे, तर मुलीचे वय 12 वर्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचा आरोप दहा जणांवर आहे.
आयपीसी कलम 377, 8, 12 नुसार त्या दहा अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना डोंगरीच्या बाल न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठवण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे.
अरोपी दहा जण अंधेरी पूर्वच्या हिंदी मीडियम शाळेमध्ये शिकत होते, यातील काही जण आठवी, नववी आणि दहावीमध्ये शिकत होते. पोलिसांनी त्यांच्या जवळील एकाचा मोबाईल जप्त केला असून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ त्यामध्ये असण्याची पोलिसांना शंका आहे.