अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: February 17, 2016 03:26 IST2016-02-17T03:26:14+5:302016-02-17T03:26:14+5:30

एका १३ वर्षीय शाळकरी मुलीला शेतात नेऊन तिच्या मित्रासह त्याच्या साथीदारांनी संगनमताने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली

Minor girl gangrape rape | अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

कल्याण : एका १३ वर्षीय शाळकरी मुलीला शेतात नेऊन तिच्या मित्रासह त्याच्या साथीदारांनी संगनमताने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाचही नराधमांना मंगळवारी सकाळी अटक केली. मंगळवारी दुपारी कल्याण न्यायालयाने या नराधमांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कल्याण पश्चिमेत राहणारी पीडित १३ वर्षीय मुलगी नवव्या इयत्तेत शिक्षण घेत असून, तिची समीप पाटील या मुलाशी मैत्री होती. सोमवारी संध्याकाळी या मुलीला समीपने फिरायला जाण्याच्या बहाण्याने फोन करून घरातून बाहेर बोलावून घेतले व अत्याचार केले. या नराधमाच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
> आरोपींची नावे
समीप प्रमोद पाटील(१९), नीलेश चंदर काळे (२५), प्रथमेश विजय भोईर (२१), विनायक किसन पाटील (२०) आणि मयुरेश परशुराम पाटील (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Web Title: Minor girl gangrape rape