अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
By Admin | Updated: September 18, 2016 13:25 IST2016-09-18T13:25:20+5:302016-09-18T13:25:20+5:30
मुलुंडमध्ये ७ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई : मुलुंडमध्ये ७ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध हत्या, पॉस्कोचा गुन्हा दाखल करत नवघर आरोपीचा शोध सुरु केला आहे.
मुलुंड आनंद नगर टोलनाका येथील रास्त्यांकडेला असलेल्या झोपडीमध्ये ही चिमुरडी आई वडील आणि लहान भावंडासोबत राहत होती.
शनिवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक ती गायब झाली. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतल्यानंतर येथ पार्क केलेल्या ट्रक खाली ती बेशुद्धावस्थेत सापडली. तिला तत्काळ मुलुंडच्या सावरकर रुग्णालयात नेले. दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरु असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली.