शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीआधीच खातेवाटपावरून खटका? शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष, भाजपाची डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:07 IST

महायुतीत शपथविधीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. त्यामुळेच आजच्या भव्य शपथविधीत केवळ ३ नेतेच शपथ घेणार असल्याचं सांगितले जात आहे.

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार बनत आहे. आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक आहेत तरीही ३ प्रमुख नेते वगळता इतर कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार हे स्पष्ट नाही. त्यात खातेवाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष असल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मागण्यांमुळे भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

वर्षा बंगल्यावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. शिंदेंकडून गृहखात्याची मागणी करण्यात येत आहे परंतु भाजपा ते सोडण्यास तयार नाही. त्यात आता अर्थखाते राष्ट्रवादीकडे नको अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने घेतली आहे तर शिंदे यांच्या पक्षाला जितकी खाती मिळतील तितकीच आम्हालाही मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत शपथविधीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. त्यामुळेच आजच्या भव्य शपथविधीत केवळ ३ नेतेच शपथ घेणार असल्याचं सांगितले जात आहे.

गृहखाते, अर्थखात्यावरून महायुतीत पेच

महायुतीला २३० हून अधिक बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार बनणार हे निश्चित झाले. परंतु मुख्यमंत्रि‍पदी कोण असेल याची चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदेंकडेच मुख्यमंत्रिपद राहावे अशी मागणी शिवसेना नेत्यांची होती. परंतु भाजपाने संख्याबळ पाहता मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केले त्यामुळे शिंदेसेना बॅकफूटवर आली. मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर गृहखाते द्यावे अशी मागणी सेनेने केली. परंतु गृहखातेही सोडण्यास भाजपाने नकार दिला. आता शिंदेसेनेने अर्थ खाते राष्ट्रवादीकडे नको अशी मागणी केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून नवा पेच निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थखाते अजित पवारांकडे होते. त्यावेळी शिवसेना आमदारांनी अजितदादा निधी देत नसल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सेना आमदारांनी बंड करून भाजपासोबत सरकार बनवले त्यावेळी आमदारांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. मात्र अवघ्या वर्ष भरात अजित पवार महायुतीसोबत सत्तेत आले. त्यात पुन्हा अर्थखाते भाजपाकडून अजित पवारांना देण्यात आले. त्यामुळे शिवसेना आमदारांची कोंडी झाली. आता नव्या सरकारमध्ये गृहखाते आम्हाला मिळत नसेल तर अर्थखातेही राष्ट्रवादीला देऊ नका अशी मागणी शिवसेनेने केल्याने मंत्र्‍यांचा शपथविधी लांबणीवर पडल्याचं बोललं जाते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना