मंत्र्यांची मुलं राजकारणात!

By Admin | Updated: February 7, 2017 23:55 IST2017-02-07T23:55:16+5:302017-02-07T23:55:16+5:30

राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजी राज्यमंत्री व पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

Ministers of politics in politics! | मंत्र्यांची मुलं राजकारणात!

मंत्र्यांची मुलं राजकारणात!

जळगाव : राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजी राज्यमंत्री व पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रताप पाटील पाळधी बुद्रूक-बांभोरी प्र.चा. या जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावत आहेत.
तसेच आमदार डॉ. सतीश पाटील यांचा मुलगा रोहन सतीश पाटील हे देवगाव-तामसवाडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवित आहेत. २६ वर्षीय रोहन यांचीदेखील ही पहिलीच निवडणूक आहे. यानिमित्ताने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची दुसरी तर आमदार डॉ. सतीश पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होत आहे.

Web Title: Ministers of politics in politics!