शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:58 IST

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही...

मुंबई : विधानसभेत मंत्री हजर नाहीत म्हणून प्रश्न पुढे ढकलावे लागतात, लक्षवेधी सूचना मागे-पुढे कराव्या लागतात. मंत्र्यांची अशी अनास्था, तर आहेच, पण संबंधित खात्याचे अधिकारी हे अदृश्य गॅलरीत बसून पूर्वी मुद्दे लिहून घेत असत, तेही हल्ली होत नाही, अशी खंत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सभागृहात व्यक्त केली. त्यावर, मुख्य सचिवांना सरकारने आदेश द्यावेत, असे निर्देश तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिले.

अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही. मंत्री सभागृहात बसत नाहीत. विधान परिषदेत कामकाज आहे, असे सांगून निघून जातात. पूर्वी गृह खात्यावर चर्चा सभागृहात व्हायची तेव्हा लॉबीमध्ये पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांपासून बडे अधिकारी बसून मुद्दे लिहून घेत असत.  पूर्वीसारखे आज तेथे सचिव वा त्यावरील दर्जाचे अधिकारी न बसता मंत्र्यांचे पीए, पीएस बसलेले असतात. सभागृहात मंत्री नाहीत, गॅलरीत अधिकारी नाहीत असेच चालले तर मग सभागृहातील सदस्यांच्या भावना सरकारच्या कानावर कशा जाणार, अशी चर्चा तर वांझोटीच ठरेल, असा हल्लाबोल जाधव यांनी केला. एखादी दुर्घटना घडली की, मंत्री पोहोचतात, पण सचिव कधीही जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्य सचिवांना आपबिती सांगासभागृहात मंत्री नसल्याने, अधिकारी दिसत नसल्याने आम्ही कसे हतबल आहोत, हे सर्वपक्षीय सदस्य पोटतिडकीने मांडत होते. सर्वांचा जास्त रोख होता तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच. त्याची दखल घेत तालिका अध्यक्षांनी याबाबत सरकारने मुख्य सचिवांनी योग्य ते आदेश द्यावेत, असे निर्देश दिले.

मंत्री झटकतात जबाबदारीशरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली की, ज्यांच्या खात्यावर चर्चा सुरू आहे, ते मंत्री सभागृहात हजर नसतात. वेगळेच मंत्री मुद्दे लिहून घेत असल्याचे सांगतात. सरकारची ही सामूहिक जबाबदारी असल्याचे कारण देत मूळ मंत्री जबाबदारी झटकतात, हा या सर्वोच्च सभागृहाचा अपमान आहे. 

भाजपचे सुरेश धस म्हणाले, सहा वर्षे विधान परिषदेचा सदस्य होतो. तेव्हा विधान परिषदेची पत ठेवली जात नाही, अशी खंत व्यक्त करायचो, आता विधानसभेत आहे तर इथेही तीच स्थिती आहे, हे थांबले पाहिजे. ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही नाराजी बोलून दाखविली.

ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सदस्यांच्या भावना लक्षात घेत मंत्री वरच्या सभागृहात असले तरी संबंधित सचिवांनी गॅलरीत बसून नोंदी घेतल्या पाहिजेत आणि तसे निर्देश अध्यक्षांनी द्यावेत, अशी विनंती केली. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारण