Minister Opportunity Person Controversial Statement | 'महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणाऱ्याला मंत्रिपद दुर्दैवीच'

'महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणाऱ्याला मंत्रिपद दुर्दैवीच'

मुंबई - महाराष्ट्र राज्याचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे मात्र यावरून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले.

रविवारी  झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसनेच्या दोन आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात, विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांचा समावेश आहे. सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे  वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला जर मंत्रिमंडळात संधी मिळत असेल तर, महाराष्ट्राचा यापेक्षा मोठ दुर्दैव  कोणते असेल, असे राणे म्हणाले.

 

२०१७ मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान , 'सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसं काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय. पण तसं काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही,' असं सावंत म्हणत असल्याचं व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्यांचावर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा झाली होती. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊन्ट वरून सावंत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे.

 

शिवसेनला २ कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरीही, ते दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे कसले पक्षप्रमुख आहे, त्यांच्या पक्षातील लोकांची त्यांना खात्री नाही. अशा शब्दात निलेश यांनी उद्धव यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Minister Opportunity Person Controversial Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.