शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:00 IST

Shiv Sena Shinde Group News: जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या.

Shiv Sena Shinde Group News: शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यांनी राजीनामा दिला नसून प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी १५ जुलै रोजी मुंबईत पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पाटील यांचा राजीनामा घ्यायचा की त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवायचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांनुसार, पाटील आता या पदावर रहायला तयार नसून त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते. यावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता जयंत पाटील यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न करू, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केल्याचे सांगितले जात आहे. 

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेचा शरद पवार गटाकडून इन्कार करण्यात आला. भाजपानेही पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले, पूर्वी मी होतो, ही संघटनात्मक प्रक्रिया आहे. जयंतराव खूप दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष होते, त्यांना बदलणार याचा अर्थ असा नाही की ते पक्ष सोडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जयंत पाटील भाजपात येणार असल्याबाबत विचारले असता त्यांनी मान हलवून 'नाही' असे उत्तर दिले. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी याबाबत मोठे विधान केले.

जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अन्य पक्षात जाणार असतील तर त्यांना शिंदेसेनेत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच गुलाबराव देवकर यांना अजित पवार गटात घेऊ नका, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. मात्र, तरीही त्यांनी देवकर यांना पक्षात घेतले. अशा चुकीच्या माणसांना पाठीशी घालणे चुकीचे असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, त्यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही. वाचलेला नाही. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात कळेल. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना आमच्या आयुष्यात झाली नाही, त्याबद्दल काय बोलणार? राजकीय पक्ष, संघटनेत जी जबाबदारी पडेल, तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी संघर्ष केला आहे. कितीही आव्हान आली तरी कालही, आजही आणि उद्याही संघर्ष करायला तयार असतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटीलJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस