शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री सुटले, अधिकारी गाळात!

By admin | Updated: June 15, 2014 02:02 IST

चितळे समितीचा अहवाल आणि त्यावरील कार्यपालन अहवाल (एटीआर) आज जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत सादर केला.

मुंबई - राज्यातील सिंचन घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यासह महादेव शिवणकर, एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, डॉ. पद्मसिंह पाटील या तत्कालीन जलसंपदामंत्र्यांना ‘क्लीन चिट’ देत अधिकाऱ्यांवर मात्र ठपका ठेवण्यात आला आहे. चितळे समितीचा अहवाल आणि त्यावरील कार्यपालन अहवाल (एटीआर) आज जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील सिंचन क्षमता केवळ ०.१ टक्के इतकीच वाढली असल्याचा निष्कर्ष २०१२च्या आर्थिक पाहणी अहवालात काढण्यात आला होता. ७० हजार कोटी रुपये खर्चूनही ०.१ टक्के इतकेच सिंचन वाढल्याच्या मुद्यावरून राजकीय वादळ उठले होते़ त्यामुळे सरकारने चौकशीसाठी चितळे समिती नेमली होती. १९९६ ते २०१२ आतापर्यंत झालेल्या सिंचन प्रकल्पांवर झालेला खर्च आणि प्रत्यक्षातील काम तपासून समितीने निष्कर्ष काढला आहे. कथित सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांना धारेवर धरले होते. मात्र, समितीने पवार यांच्यासह तत्कालीन सर्व जलसंपदामंत्र्यांवर कोणताही ठपका ठेवलेला नाही. एवढेच नाही तर सिंचन क्षमता निर्मितीत २६ टक्के इतकी वाढ झाल्याचा निष्कर्षही समितीने नोंदवला आहे. सिंचन महामंडळाचे वित्त अधिकारी आणि कार्यकारी संचालकांनी प्रकल्पाच्या किमती वाढवण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळाला देऊनही त्यास मंजुरी दिली गेली, असा ठपका चितळे समितीने ठेवला आहे. हे लक्षात घेता जलसंपदामंत्री राहिलेले अजित पवार आणि इतर तत्कालीन जलसंपदामंत्र्यांवर हा ठपका आहे, असा आरोप विरोधकांनी केला. त्यावर चार प्रकल्पांबाबत असे घडले होते, पण तशी मंजुरी देण्याचे अधिकार जलसंपदामंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या नियामक मंडळाला होते, अशी भूूमिका शासनाने घेतली आहे. आर्थिक पाहणी अहवालात एकूण सिंचित क्षेत्राची तुलना सतत कमी-जास्त होणाऱ्या एकूण पीक क्षेत्राशी केल्यामुळे त्या आधारे काढलेले निष्कर्ष अयोग्य व गैरसमज पसरवणारे असण्याची शक्यता निर्माण होते, असेही समितीने म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)