दीक्षाभूमीवर ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी
By Admin | Updated: October 22, 2015 14:25 IST2015-10-22T14:25:02+5:302015-10-22T14:25:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरात लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दीक्षाभूमीवर ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.२२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरात लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यासाठी नागपूरात प्रतेक वर्षी लाखोंच्या संख्येने बौद्धधर्मिय उपस्थित राहतात. या वर्षीच्या ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी हातात पंचशील ध्वज आणि जयभीमच्या घोषणा देत अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचत आहेत.
आज (गुरुवार) दीक्षाभूमीवर ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राधामोहन सिंग यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होणार असल्याची माहीती आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरात बौद्ध धर्मियांची मोठी गर्दी झाली आहे. येथे गेल्या दोन दिवसांत २४ हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. गेल्या चार दिवसांपासून आंबेडकरी अनुयायांचे पावले दीक्षाभूमीकडे वळत आहेत.