‘गिरणी कामगार मुंबई बंद पाडणार!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:48 IST2017-07-18T00:48:49+5:302017-07-18T00:48:49+5:30

हक्काच्या घरांसाठी १ आॅगस्टला महामोर्चाची हाक दिलेल्या गिरणी कामगार कृती समितीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. रविवार आणि सोमवारी कोकण

'Mill worker to stop Mumbai!' | ‘गिरणी कामगार मुंबई बंद पाडणार!’

‘गिरणी कामगार मुंबई बंद पाडणार!’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हक्काच्या घरांसाठी १ आॅगस्टला महामोर्चाची हाक दिलेल्या गिरणी कामगार कृती समितीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. रविवार आणि सोमवारी कोकण आणि पुण्यात पार पडलेल्या कृती समितीच्या सभांना गिरणी कामगारांनी गर्दी केली होती. या वेळी महामोर्चाने मुंबई बंद पाडण्याचा निर्धार कृती समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केला.
मोहिते म्हणाले की, कृती समितीने १ आॅगस्ट रोजी गिरगाव चौपाटीहून विधानभवनापर्यंत धडक मोर्चाची हाक दिली आहे. कृती समितीचे नेते दत्ता इस्वलकर म्हणाले की, हक्काची घरे देऊन सरकारने गिरणी कामगारांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करावे.

Web Title: 'Mill worker to stop Mumbai!'