सोलापुरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: February 3, 2017 00:57 IST2017-02-03T00:57:33+5:302017-02-03T00:57:33+5:30

टेंभुर्णी (ता़ माढा) येथील पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाचजणांच्या टोळीला जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीसांना यश आले आहे़ या टोळीकडून

Militant gang robbery in Solapur | सोलापुरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

सोलापुरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

सोलापूर : टेंभुर्णी (ता़ माढा) येथील पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाचजणांच्या टोळीला जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीसांना यश आले आहे़ या टोळीकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूस, मोटारसायकल, लोखंडी कोयता, सुरा असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी, करमाळा, कुर्डूवाडी भागात गस्त चालू असताना टेंभुर्णी ते करमाळा रोडवरील टोलनाक्याच्या पाठीमागे काही लोक दरोडा टाकण्याच्या इराद्याने बसल्याचे कळाले़ त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना त्याब्यात घेतले. राहुल जिगऱ्या काळे, लखन उर्फ लख्या जिगऱ्या काळे, किरण उर्फ खोब्यात जिगऱ्या काळे, पप्पू नीलकंठ काळे आणि सागर उचल्या भोसले अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा,आठ एम़ एम़ बोअरचे जिवंत काडतूस, मोटारसायकल, मोठा धारदार लोखंडी कोयता, लोखंडी सुरा, लाल मिरचीची पुड असा एकूण ४५ हजार २२० रूपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Militant gang robbery in Solapur