मिलिंद सोमण देणार ठाणेकरांना फिटनेस टिप्स

By Admin | Updated: November 4, 2016 03:19 IST2016-11-04T03:19:35+5:302016-11-04T03:19:35+5:30

मिलिंद सोमण यांनी सहमती दर्शविली असून बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांनी त्याबाबत सविस्तर चर्चा केली.

Milind Soman giving fitness tips to Thanekar | मिलिंद सोमण देणार ठाणेकरांना फिटनेस टिप्स

मिलिंद सोमण देणार ठाणेकरांना फिटनेस टिप्स


ठाणे : स्वच्छ -सुंदर ठाण्याला आता सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली देण्यासाठी प्रख्यात अभिनेता, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मॉडेल आणि खेळाडू मिलिंद सोमण यांनी सहमती दर्शविली असून बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांनी त्याबाबत सविस्तर चर्चा केली.
बॉलीवूड, हॉलीवूड, मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर काही वर्षांपासून मिलिंद सोमण यांनी आरोग्य, फिटनेस आणि अ‍ॅथलेटिक्स या क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी देश-विदेशात अनेक उपक्र म राबविण्यास सुरूवात केली आहे. ते स्वत: एक उत्तम खेळाडू, जलतरणपटू असून गेल्या काही वर्षांपासून ते फिटनेस, आरोग्य आणि क्रीडा याबाबत सातत्याने विविध उपक्र म राबविण्यामध्ये आघाडीवर आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा असून आता ते ठाणेकरांना फिटनेस आणि आरोग्यचा मंत्र देणार आहेत. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन चर्चा करून काही सूचना केल्या आहेत.
>मिलिंद सोमण यांचे नाव गेल्या काही वर्षांत मॅरेथॉनशी, धावण्याशी जोडले गेले आहे. त्यातून फिटनेसशी जोडला गेलेला मॉडेल, अशी त्याची प्रतिमा असल्याने त्याचा मोहिमेसाठी पालिकेला उपयोग होईल. तरूणांनाही आकर्षित करता येईल.

Web Title: Milind Soman giving fitness tips to Thanekar