शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा आणि संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, साडवली परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 13:07 IST

हा धक्का विशेष करून इमारतीत उंच ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना अधिक जाणवला. याशिवाय, साताऱ्यातही आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. 

रत्नागिरी/सातारा - गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात पावसाचा जोर असतानाच रविवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हा धक्का विशेष करून इमारतीत उंच ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना अधिक जाणवला. याशिवाय, साताऱ्यातही आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. (Mild earthquake in Devrukh, Sadavali area and Satara district)

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर वातावरणात काहीसा बदल झाला आहे. वादळानंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर आहे. तर काही वेळा कडकडीत ऊन पडत आहे. मात्र, रविवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील काही भागात भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून गेले होते. पण, सौम्य धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.

काही घरांत भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भांड्यांच्या आवाजाने नागरिकांना भूकंप झाल्याची जाणीव झाली. तर काहीजण झोपेत असताना बेड हल्ल्याने भीतीने जागे झाले. भूकंपाची तीव्रता मोठी नसली तरी तो नागरिकांना जाणवला.

सातार्‍यातही भूकंपाचा धक्का -सातारा येथे आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी ३.३ रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. या भुकंपाचे केंद्र सातार्‍यात जमिनीखाली ५ किमी खोल होते. भुकंपाचे केंद्रबिंदू मुंबईपासून २१६ किमी दूर आहे. १७.३६ आणि ७३.८४ रेखांश आणि अक्षांशावर याचा केंद्रबिंदू होता.

पाटण परिसरात तीन रिस्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि कोयना धरण परिसरातही रविवारी सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी तीन रिस्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे स्वरूप सौम्य असल्याची माहिती कोयनानगर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

कोयना धरण परिसरात गेल्या महिन्यातच भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते. त्यातील दोन धक्के एका दिवशी लागोपाठ बसले होते. त्यापाठोपाठ रविवारीही हादरा बसला. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र कोयना धरणाला कसलाही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. 

 

टॅग्स :EarthquakeभूकंपSatara areaसातारा परिसरRatnagiriरत्नागिरी