शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या पणन विभागाची होणार ‘साफसफाई’!

By admin | Updated: December 26, 2014 04:25 IST

म्हाडातील सर्वाधिक मलिदा मिळणाऱ्या विभागांपैकी असलेल्या पणन विभागाची आता लवकरच ‘साफसफाई’ केली जाणार आहे

मुंबई : म्हाडातील सर्वाधिक मलिदा मिळणाऱ्या विभागांपैकी असलेल्या पणन विभागाची आता लवकरच ‘साफसफाई’ केली जाणार आहे. या ठिकाणी नियुक्तीला असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आता अन्य विभागांमध्ये उचलबांगडी केली जाणार आहे. लाचखोरी, निलंबन आणि विभागाबाबत वाढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या ३, ४ दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल्या केल्या जाणार असल्याचे समजते.म्हाडाने मुंबईत बांधलेल्या घरांची लॉटरी, गिरणी कामगारांसाठीच्या सोडतीतील विजेत्यांच्या अर्जांची छाननी, पात्रता, अपात्रता निश्चिती, घरांचे वितरण, त्याचा ताबा देण्याचे काम मुंबई मंडळातील पणन विभागामध्ये उपमुख्य अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत सुमारे ३० वर जणांचा स्टाफ करीत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या विभागामध्ये लाचखोरीची दोन प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. तसेच भ्रष्टाचाराबाबत तक्रार अर्जावरून विभागांतर्गत केलेल्या चौकशीतून एका लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे, त्याशिवाय या ठिकाणी कार्यरत असलेल्याबद्दल तक्रारींची संख्या वाढत असल्याने म्हाडाची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या ‘टॉप टू बॉटम’पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी घेतला आहे. त्यांनी आतापर्यंत केलेला सेवा कालावधी, कामाच्या ठिकाणानुसार त्यांची इतरत्र बदली केली जाईल, त्याबाबत प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या दर्जानिहाय प्रस्ताव बनविला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (प्रतिनिधी)