रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:47 IST2025-07-22T18:46:03+5:302025-07-22T18:47:57+5:30
Mhada Konkan Lottery 2025: ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, मुंबईसारख्या महागड्या शहरात घरांचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. अशातच ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून ५ हजार ६३२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या घरांमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध असणार आहेत.
म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्था परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देतात, म्हणूनच दरवर्षी हजारो अर्जदार या योजनांकडे आशेने पाहत असतात. नुकतीच कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने ठाणे शहर व जिल्ह्यातील घरांसाठी सोडत जाहीर केली. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी काही महत्त्वाच्या तारखा आहेत, त्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
म्हाडाच्या लॉटरी २०२५: महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ ऑगस्ट २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
पात्र लोकांची पहिली यादी: २१ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)
दावे आणि हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)
पात्र लोकांची अंतिम यादी: १ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)
म्हाडाच्या लॉटरीचा ड्रॉ: ३ सप्टेंबर २०२५ (सकाळी १० वाजता, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह)