MHADA Lottery 2025 Pune News:पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे. (Mhada Lottery 2025 Update)
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व पात्र अर्जदारांसाठी दिनांक १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन पद्धतीने पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
म्हाडाच्या घरांचे वितरण कसे केले जाणार?
विकासकांकडून शिल्लक सदनिकांचा अहवाल जसजसा प्राप्त होईल तसतशा सदर सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील.
म्हाडाच्या घरासाठी इथे भरा अर्ज
गरजू व-पात्र लाभार्थ्यांनी (https://bookmyhome.mhada.g ov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे व पुणे मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे.