शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एमएच-सीईटीमध्ये अकोल्याचा आफरीद जयपुरी राज्यात तिसरा

By admin | Updated: June 5, 2015 23:47 IST

अकोल्यातील आफरीद जयपुरी याने २00 पैकी १९७ गुण प्राप्त करून राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला.

अकोला : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान सामायिक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी २0१५) अकोल्यातील आफरीद जयपुरी याने २00 पैकी १९७ गुण प्राप्त करून राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा एमएच-सीईटी २0१५ चा निकाल शुक्रवार, ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर झाला. या प्रवेशपूर्व परीक्षेत अकोलाच्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आफरीद जयपुरी याला २00 पैकी १९७ गुण मिळाले. त्याला जिवशास्त्रात ९९, तर भौतिकशास्त्र आणि रसायणशास्त्रात प्रत्येकी ४९ गुण मिळालेत. अकोल्यातील मेहरबानो विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हर्ष चौधरी यालादेखील २00 पैकी १९७ गुण मिळाले असून, त्याने राज्यात आठवा क्रमांक पटकाविला आहे. हर्षला जीवशास्त्र विषयात आफरीदपेक्षा एक गुण कमी मिळाल्याने त्याचा गुणतालिकेतील क्रमांक घसरला. हर्षला जीवशास्त्र विषयात ९८ गुण मिळाले आहेत तर आफ्रीदला ९९ गुण मिळाले आहेत. हर्षला भौतिकशास्त्र विषयात ५0 पैकी ५0 गुण मिळाले आहेत.