भारतातील अग्रगण्य स्वयंपाक, वाहनांमधील गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने आपल्या सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये घरगुती (PNG) आणि वाहतुकीसाठीच्या (CNG) गॅसचा अखंडित पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी कंपनीने ग्राहकांसाठी अनेक आकर्षक सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत.
९ मार्च २०२६ च्या सरकारी आदेशानुसार, PNG आणि CNG ला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी MGL ने खालील उपक्रम सुरू केले आहेत. १६ मार्च २०२६ पासून होणाऱ्या सर्व नवीन नोंदणींवर ५०० रुपयांचा मोफत गॅस मिळेल. नोंदणी केल्यावर ग्राहकांना एक 'स्क्रॅच कार्ड' मिळेल, ज्याद्वारे २५० ते १,००,००० रुपयांपर्यंतची तत्काळ बक्षिसे जिंकता येतील. नवीन इमारतींमध्ये ६० टक्क्यांहून अधिक शिरकाव असल्यास ग्राहकांना गॅस बिलात १००० रुपयांची सवलत मिळेल. ऑनलाईन नोंदणी केल्यास ५०० रुपयांची सूट आणि वापर नसलेल्या काळातील किमान शुल्क माफ केले जाईल. लवकरच शून्य आगाऊ नोंदणी शुल्क सुविधा सुरू होणार असून, पैसे काम पूर्ण झाल्यावरच भरावे लागतील.
ही सवलत कंपनीच्या सर्व भौगोलिक कार्यक्षेत्रांसाठी (GAs) लागू होते - मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, चित्रदुर्ग, दावणगेरे, लातुर आणि धाराशीव.
व्यावसायिक ग्राहकांसाठी विशेष सवलतव्यावसायिक ग्राहकांसाठी नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच, जे ग्राहक स्वतःहून डाऊनस्ट्रीम इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करतील, त्यांना वर्षभरात १,२०,००० रुपयांपर्यंतची सवलत मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
फसवणूक टाळण्यासाठी 'MGL'च्या सूचनाग्राहकांनी ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.१. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका किंवा APK फाईल्स डाऊनलोड करू नका.२. OTP किंवा बँकेचा तपशील कोणाशीही शेअर करू नका.३. केवळ अधिकृत व्हॉट्सॲप नंबर +91 98992 03843 (ब्लू टिक असलेला) यावरच विश्वास ठेवा.
Web Summary : MGL assures uninterrupted gas supply, offering ₹500 free gas on new PNG connections. Attractive discounts, including ₹1000 off on gas bills for high penetration in new buildings and waived registration fees for commercial clients, are available. Beware of online fraud; trust only official channels.
Web Summary : MGL ने निर्बाध गैस आपूर्ति का आश्वासन दिया, नए PNG कनेक्शन पर ₹500 मुफ्त गैस की पेशकश की। नए भवनों में उच्च प्रवेश के लिए गैस बिलों पर ₹1000 की छूट और वाणिज्यिक ग्राहकों के लिए पंजीकरण शुल्क माफ करने सहित आकर्षक छूट उपलब्ध हैं। ऑनलाइन धोखाधड़ी से सावधान रहें; केवल आधिकारिक चैनलों पर भरोसा करें।