शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो प्रवासाची लवकरच स्वप्नपूर्ती!

By admin | Updated: August 14, 2014 01:24 IST

विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २१ आॅगस्टला भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे.

मेट्रो रेल : प्रकल्पाच्या भूमिपूजनासोबतच विकासालाही गती मिळणारनागपूर : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २१ आॅगस्टला भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे. सोबतच २५ लाख नागरिकांची मेट्रो रेल्वे प्रवासाची स्वप्नपूर्ती होणार असल्याने शहरासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे.वाढती लोकसंख्या व वाहनांची होणारी गर्दी यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. मेट्रोमुळे ही समस्या मार्गी लागणार आहे. नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रोमार्ग आहेत. या मार्गांची एकूण लांबी ३८.२ किलोमीटर आहे. सहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावानुसार १०५२६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दिल्ली मेट्रोरेल कार्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या दोन्ही मार्गिकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कार्पोरेशन लिमिटेड नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल(एसीव्ही)कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि.या कंपनीस या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिकार देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईपर्यत नागपूर सुधार प्रन्यास या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहात आहे. या प्रकल्पात केंद्र शासनाचा २० व राज्य शासनाचा २० टक्के तर महापालिका व नासुप्रचा प्रत्येकी ५ टक्के सहभाग राहणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी कर्ज आणि इतर स्रोताव्दारे उभारला जाणार आहे. (प्रतिनिधी)