मेट्रो भाडेवाढ पुन्हा टळली

By Admin | Updated: August 5, 2016 05:23 IST2016-08-05T05:23:17+5:302016-08-05T05:23:17+5:30

मुंबई मेट्रोची भाडेवाढ पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. मेट्रो भाडेवाढीच्या याचिकेवरची सुनावणी २२ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली

Metro fare halted again | मेट्रो भाडेवाढ पुन्हा टळली

मेट्रो भाडेवाढ पुन्हा टळली


मुंबई : मुंबई मेट्रोची भाडेवाढ पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. मेट्रो भाडेवाढीच्या याचिकेवरची सुनावणी २२ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अंतिम सुनावणी घेऊन मेट्रोच्या भाववाढीचा निर्णय होईल.
दरनिश्चिती समितीने (एफएफसी) मेट्रोला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या ११.४ कि.मी. मार्गासाठी १० रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत भाडेवाढ करण्याची परवानगी दिली. एफएफसीच्या या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली.
ही याचिका प्रलंबित असतानाच एमएमओपीएलने १ डिसेंबर २०१५पासून सध्या आकारल्या जाणाऱ्या भाड्यात किमान ५ रुपयांची भाडेवाढ करण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. कोर्टाने १७ डिसेंबर २०१५ रोजी या अंतरिम भाडेवाढीला स्थगिती दिली. बुधवारी न्या. कानडे व न्या. सोनक यांच्यापुढे सुनावणी झाली. (प्रतिनिधी)
खंडपीठाने या याचिकेवर
२२ आॅगस्ट रोजी अंतिम सुनावणी ठेवली आहे, त्यामुळे अंतरिम भाडेवाढीला दिलेली स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना
२२ आॅगस्टपर्यंत तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Web Title: Metro fare halted again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.