प्रथम व द्वितीय सत्राचा गोंधळ

By Admin | Updated: April 30, 2016 00:34 IST2016-04-30T00:34:02+5:302016-04-30T00:34:02+5:30

नेमका गोंधळ काय आहे, हे तपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने शहरातील ४० महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे.

The mess of the first and second session | प्रथम व द्वितीय सत्राचा गोंधळ

प्रथम व द्वितीय सत्राचा गोंधळ

पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र यांच्यामधील नेमका गोंधळ काय आहे, हे तपासण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने शहरातील ४० महाविद्यालयांकडून माहिती मागविली आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने, राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांकडून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, तुकड्यांची संख्या, तसेच सत्रनिहाय अध्यापकांची संख्या यांची सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच महाविद्यालयांच्या दोन सत्रांच्या वेळांमधील फरक यांची माहितीसुद्धा मागविण्यात आली आहे.
दुसऱ्या सत्रातील पदविका अभ्यासक्रमांसाठी जर २५ टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले असतील तर त्याची आकडेवारी मागविण्यात आली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचे ८ महाविद्यालयांचे प्रस्ताव पुणे विभागातून ८ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी द्वितीय सत्रातील पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचे प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविले आहेत, अशी माहिती डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिली.

Web Title: The mess of the first and second session