शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

'मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करुन दाखवा'; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:37 IST

Belgaum Municipal Election: 'बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली.'

मुंबई: नुकतंच बेळगाव महापालिकेचा निकाल लागला. त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं, तर शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं. त्या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला आहे ना, मग मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा', असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

बेळगाव महापालिकेच्या निकालात भाजपला बहुमत मिळालं, त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपने मराठी माणसालाच पाडल्याची टीका केली. त्यानंतर भाजपनेही पलटवार करत निवडून आलेले निम्म्याहून अधिक उमेदवार मराठी असल्याचं सांगितलं. तसेच, बेळगाव पालिकेवर भगवा फडकला असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राऊत यांनी ट्विट करुन भाजपला बेळगाव महाराष्ट्र विलीन करण्याचं आव्हान दिलं आहे.

राऊत यांचे ट्विट...

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ''बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!'', असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याचे पडसाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर संजय राऊत यांच्यावर टीका करताना बेळगावमध्ये निवडूण आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेशमा पाटील असे नगरसेवक मराठी माणसं वाटत नाहीयेत का? शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत का? असा सवाल केला.

महाराष्ट्राच्या मतदारने युतीला बहुमत दिलं, पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. पाकिस्तानचे व कलम 370 चे गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाही तर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला व युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठी जणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुक़ेशाहीचा वापर केला. वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथून पुढेही भोगावा लागणार आहे, असा इशारा पडळकरांनी राऊत आणि शिवसेनेला दिला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbelgaonबेळगावGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेना