शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

पारा@४५; उष्णतेची लाट, धुळीचे वादळ, अवेळी पावसासह उकाडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 6:41 AM

उत्तर भारतात येणार धुळीचे वादळ : आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक

मुंबई : मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असतानाच देशासह राज्याच्या हवामानात मान्सूनपूर्व बदल नोंदविण्यात येत आहेत. या बदलाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर उत्तर भारतात काही ठिकाणी धुळीचे वादळ उठणार असून, काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शिवाय दक्षिण भारतातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला आहे.राज्याचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसहून अधिक नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र आर्द्रतेमधील चढउतार मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार...च्जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढेल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीच्या वादळासह पावसाची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये हवामान उष्ण आणि कोरडे राहील. विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येईल.

च्आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व बिहार, झारखंड आणि ओरिसामध्ये पावसाची शक्यता आहे. तेलंगणामध्ये उष्णतेची लाट येईल. केरळ आणि कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, रायलसीमा आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. अंदमान व निकोबार द्वीपसमूहावर पाऊस राहील.विदर्भात उष्णतेची लाट२३ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.२४ आणि २५ मे : विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.२६ मे : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेचीलाट येईल.कोकणात पावसाची शक्यता२३ मे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.२४ मे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.च्मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.च्राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यातआले आहे.मुंबई राहणार ढगाळच्गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील.च्मुंबईची आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत असून कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात