शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

गुणी बैलाची समाधी; सहा वर्षांपासून केला जातो पुण्यतिथी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 21:38 IST

घरधनी दारू पिऊन आला की, दावणीला बांधलेला ‘राजा’ त्याच्या अंगावर धावून जाई, त्याला अजिबात जुमानेसा होई. राजाच्या या वागण्याचा धसका घेऊन मालकाने चक्क दारूच सोडली.

- अमर गायकवाड

वडशिंगे (ता. माढा, जि. सोलापूर) : घरधनी दारू पिऊन आला की, दावणीला बांधलेला ‘राजा’ त्याच्या अंगावर धावून जाई, त्याला अजिबात जुमानेसा होई. राजाच्या या वागण्याचा धसका घेऊन मालकाने चक्क दारूच सोडली. काही वर्षांपूर्वी दारूचे व्यसन सोडविणाऱ्या आपल्या या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रिधोरे येथील शेतक-याने त्याची समाधी बांधली. तसेच त्याची पुण्यतिथी पाळली जाते.बैलजोडीने धनाजी गायकवाड यांना खूप काही मिळवून दिले. त्यांना दारुचे व्यसन होते. धनाजी दारू पिऊन यायचे, तेव्हा बैलजोडीपैकी राजा या बैलाच्या स्वभावात, हालचालीत फरक दिसायला. दारू प्यायल्यानंतर ‘राजा’ त्यांना जवळ येऊ देत नसे. त्यांच्या अंगावर धावून जात असे. हा प्रकार घरच्यांना समजला. ‘आता तरी दारु सोडा’ असा सल्लाही कुटुंबीयांनी त्यांना दिला. त्यामुळे ‘राजा’साठी दारू सोडण्याची शपथ धनाजी यांनी घेतली. त्यांनी दारू सोडली आणि राजा पुन्हा त्यांच्या हुकुमात आला.‘राजा’ने निरोप घेतला...दारूचे व्यसन सुटले, घरातील वातावरण आनंदी झाले अन् धनाजी बैलगाडीतून पंढरपूरला वारीला जाऊ लागले. मात्र सहा वर्षांपूर्वी ‘राजा’चा अचानक मृत्यू झाला. ‘राजा’चा तिसरा, चौथा विधी आटोपून धनाजी यांनी ‘राजा’ची समाधी बांधली. गेल्या ६ वर्षांपासून धनाजी आणि त्यांचे कुटुंबीय ‘राजा’ची पुण्यतिथी पाळतात. घरापासून समाधीपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात काढण्यात येते. नुकतीच कथा, कीर्तनाने राजाची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर