शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गडबडीत मोटरमन ब्रेक लावायचे विसरला आणि 'तो' अपघात घडला

By admin | Updated: July 24, 2015 20:11 IST

फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटरमन ब्रेक लावायला विसरल्यानेच चर्चगेट स्थानकात ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढून अपघात झाला, असे रेल्वेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - फास्ट ट्रेन पकडण्याच्या नादात मोटरमन ब्रेक लावायला विसरल्यानेच चर्चगेट स्थानकात ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढून अपघात झाला, असे रेल्वेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे.  रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आलेल्या ५० पानी अहवालात मोटरमन तिवारींना  या अपघातासाठी पूर्णपणे दोषी ठरवण्यात आले आहे. 
गेल्या महिन्यात झालेल्या या अपघातात चर्चगेट स्थानकात आलेली लोकलची प्लॅटफॉर्मला धडकली व  लोकलचे काही डबे थेट प्लॅटफॉर्मवरच चढले. या घटनेत मोटरमनसह ५ जण जखमी झाले होते. 'ही गाडी जेव्हा चर्चगेट स्थानकात येत होती तेव्हा शेजारच्या प्लॅटफॉर्मवर विरारला जाणारी गाडी उभी होती. त्यामुळे ती गाडी पकडून घरी जाण्याच्या गडबडीत असलेल्या मोटरमन तिवारी यांनी घाईघाईत गाडीचे ब्रेकट लावले नाहीत' असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 'तसेच गाडी जेव्हा स्थानकात येत होती तेव्हा तिवारींनी आपले लोकल ड्रायव्हिंगचे सामान तसेच सोडून स्वत:चे सामान आवरण्यास सुरूवात केली. त्यामुळे हा अपघात तिवारी यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे' असा ठपका चौकशी अहवालातून तिवारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 
मात्र याप्रकरणी दोषी ठरलेल्या किवारींवर यापुढे काय कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.