परेच्या प्रवाशांचे सलग दुस-या दिवशी मेगाहाल
By Admin | Updated: September 16, 2015 09:36 IST2015-09-16T09:36:52+5:302015-09-16T09:36:52+5:30
अंधेरी विलेपार्ले दरम्यान रुळावरुन घसरलेल्या लोकल ट्रेनचा शेवटचा डबा हटवण्यात आला असला तरी लोकल गाड्यांचा खोळंबा बुधवारीही कायम आहे.

परेच्या प्रवाशांचे सलग दुस-या दिवशी मेगाहाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - अंधेरी विलेपार्ले दरम्यान रुळावरुन घसरलेल्या लोकल ट्रेनचा शेवटचा डबा हटवण्यात आला असला तरी लोकल गाड्यांचा खोळंबा बुधवारीही कायम आहे. गाड्या विलंबाने धावत असल्याने पश्चिम रेल्वेवरील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असून तासाभरात वाहतूक पूर्ववत होईल असा अंदाज आहे.
मंगळवारी अंधेरी विलेपार्ले दरम्यान लोकल ट्रेनचे डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. चर्चगेटकडे जाणा-या जलद मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घसरेले डबे रुळावरुन हटवण्यात यश आल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले. मात्र ऐन गर्दीच्या वेळीही वाहतूक पूर्ववत न झाल्याने प्रवाशांना सलग दुस-या दिवशी मनस्ताप सोसावा लागत आहे.
पश्चिम रेल्वेवरील खेळखोळंबा बघून अनेक प्रवाशांनी गाड्यांनी प्रवास करण्यास प्राधान्य दिले. मात्र त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही भीषण वाहतूक कोंडी झाली होती.