शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:21 IST

Maharashtra Government Jobs: देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, १० हजार ३०९ जणांना सरकारी नोकरीचे नियुक्तिपत्र प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकरभरती अत्यंत पारदर्शक व गतिशील पद्धतीने करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी          शनिवारी येथे केली. अनुकंपा तत्त्वावरील ५,१८७ आणि एमपीएससीमार्फत नियुक्त ५,१२२ अशा एकूण १० हजार ३०९ उमेदवारांना नोकरीची नियुक्तीची प्रमाणपत्रे देण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्री व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आज राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित ८० टक्के प्रकरणात नोकऱ्या दिलेल्या आहेत. उर्वरित २० टक्के नोकऱ्या  चार महिन्यांत देण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  एमपीएससीमार्फत होणारी नोकर भरती बरेचदा रेंगाळते त्यात तीन-चार वर्षे निघून जातात; मात्र यापुढे ही भरती वेगवान पद्धतीने केली जाईल. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यासाठी अभ्यास केला आहे. वेगवान भरतीची पद्धत येत्या काही महिन्यांत निश्चित केली जाईल आणि पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुठेही लाच देऊ नका सरकारी नोकरी देताना आम्ही पारदर्शकता आणली आहे, कोणालाही लाच कुठेही द्यावी लागत नाही. आपण जनतेचे सेवेकरी आहोत, ही भावना बाळगून काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. मंत्री छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, आशिष शेलार, जयकुमार रावल, दादा भुसे, आ. परिणय फुके, मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव इकबालसिंह चहल यावेळी उपस्थित होते.

चांदा ते बांदा जाण्याची तयारी ठेवासरकारने तुम्हाला नियुक्ती दिली आहे. आता विशिष्ट गाव शहरातच बदली झाली पाहिजे, असा आग्रह धरू नका.त्यासाठी मुख्यमंत्री, मंत्र्यांकडे चकरा मारू नका. चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जाण्याची तयारी ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

प्रशासनात गतिमानता,   व्ही. राधा यांची प्रशंसा सामान्य प्रशासन विभागामध्ये अनेक चांगले बदल घडवून आणल्याबद्दल अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.विभागाच्या कारभारात त्यांनी गतिमानता आणली पारदर्शकता आणली अनेक वर्षांपासून तेच ते असलेले सेवा प्रवेश नियम सुधारले, विभागाच्या कामकाजाला बळकटी आणली, असे ते म्हणाले.

शहीद प्रकाश मोरे यांच्या कन्येला मिळाली नियुक्ती२००८ मधील मुंबई अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का हिला अनुकंपा तत्त्वावर आज नोकरी मिळाली. वर्ग ब अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली आहे.मात्र, त्यासाठी तिने एमपीएससीमार्फत सेवेत यायला हवे, ही अट एमपीएससीने आमच्या विनंतीनुसार मान्य केली आणि तिला नोकरी देणे शक्य झाले, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mega government job recruitment next year, MPSC won't be delayed: Fadnavis

Web Summary : Next year, a mega government job drive will occur transparently. 10,309 candidates received appointment letters. Pending compassionate appointments will be resolved soon. MPSC recruitment will be faster, and transparency is ensured. No bribes are needed, said CM Fadnavis.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgovernment jobs updateसरकारी नोकरी