शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा लवकरच ठरणार? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 14:05 IST

कोरोनाचे सावट असल्यामुळे संमेलनाबाबत अद्यापही नाही ठोस निर्णय..

ठळक मुद्देशासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप नाही

पुणे : यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अद्यापही कोणताच ठोस निर्णय साहित्य महामंडळाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र आता त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साहित्य महामंडळाने सर्व घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची येत्या 3 जानेवारीला औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. सर्व सदस्यांनी संमेलन आयोजनासाठी होकार दर्शविल्यानंतर स्थळ निवड समिती, संमेलन नियोजन समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बदललेल्या परिस्थितीत आयोजनाची तयारी कशी असेल, यावर निर्णय ठरेल. 

साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीकरिता अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१५ मध्ये पंजाबमधील घुमान येथे संमेलन आयोजित करण्याचा मान सरहद संस्थेला देण्यात आला होता.  जानेवारीमध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनावेळी नाशिक आणि अंमळनेर येथून पुढील संमेलनासाठी निमंत्रणे आली होती.त्या निमंत्रणावर बैठकीत चर्चा होणार आहे.  मात्र  करोनामुळे परिस्थिती बदलल्याने या दोन शहरातील संस्थांची आर्थिक तयारी आहे का, याचा विचार केला जाणार आहे. याउलट सरहदने ऐन करोनाकाळात महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे. मात्र महामंडळाने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. करोनामुळे हे वर्ष आर्थिक संकटातून जात असताना संमेलनासाठी निमंत्रण देणार्‍या संस्था आयोजनाबाबत पुर्नविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, स्थळ निश्चित नसल्याने महामंडळाला शासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप मिळू शकलेले नाही. शासनाकडून महामंडळाला सातत्याने विचारणा होत आहे. मात्र महामंडळाने अद्याप शासनाला संमेलनाबाबत ठोस कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे या बैठकीकडे  मराठी बांधवांचे लक्ष लागले आहे.....संमेलनासंदर्भातील बैठकीसाठी सदस्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. संस्था आयोजनाला तयार आहेत का? संमेलन कशा पद्धतीने करायचे? निधी उपलब्ध होईल का? असे सगळे प्रश्न आहेत. संमेलनाच्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा विचार केला जाईल- -प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष साहित्य महामंडळ.....

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळmarathiमराठीcorona virusकोरोना वायरस बातम्या