मीरा-भार्इंदरचे सहा स्केटिंगपटू गिनिज बुकात
By Admin | Updated: June 28, 2017 03:15 IST2017-06-28T03:15:30+5:302017-06-28T03:15:30+5:30
मीरा-भार्इंदरमधील सहा स्केटींगपटूंनी कर्नाटकमधील बेळगाव येथे झालेल्या जागतिक विक्रम स्पर्धेत सलग ५१ तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.

मीरा-भार्इंदरचे सहा स्केटिंगपटू गिनिज बुकात
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील सहा स्केटींगपटूंनी कर्नाटकमधील बेळगाव येथे झालेल्या जागतिक विक्रम स्पर्धेत सलग ५१ तास स्केटिंग करून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
भार्इंदर येथील राई गावात राहणारा अमन राऊत व भार्इंदर पूर्वेकडील गोल्डन नेस्टमध्ये राहणारा प्रथम ओस्तवाल हे दोघे मीरा रोड येथील आरबीके या खाजगी शाळेत आठवीत शिकतात. तर मीरा रोड येथील गोल्डन नेस्टमध्ये राहणारे कल्पेश सोनी, क्रिश मायावंशी व सावित बंगेरा हे रामरत्न विद्यामंदिर या
खाजगी शाळेत अनुक्रमे पाचवी, सहावी व तिसऱ्या इयत्तेत श्कित आहेत. याच परिसरात राहणारा विजय चापवाले हा मीरा रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल या शाळेत सहावीत शिकायला आहे. हे सर्व प्रशिक्षक दयानंद शेट्टी व क्षितीज सिंह यांच्याकडे प्रशिक्षण घेतात.
सर्वांमध्ये अनेक तास सलग स्केटिंगची क्षमता असल्याने प्रशिक्षकांनी त्यांना बेळगाव येथील स्केटिंगपटू ज्योती चिंदक यांच्यावतीने झालेल्या जागतिक स्पर्धेत सहभाग घेण्याचा सल्ला दिला. या विद्यार्थ्यांनी सलग ५१ तास स्केटींग केले. या जागतिक विक्रमामुळे त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाली.