शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी औषधवारी सज्ज; त्वचेच्या रोगावरील औषधांमध्ये यंदा वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 07:48 IST

या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ पासून औषधवारीचे आयोजन केले जाते

ठाणे : ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असे म्हणत लाखो वारकरी वारीसाठी पायी जातात. विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी ठाणे शहरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही औषधवारी निघणार आहे. दमटपणामुळे खाजेचे प्रमाण वाढणे, त्वचेचा संसर्ग होणे यासारख्या आजारांवरील औषधांत यंदा वाढ केली असल्याचे या औषधवारीचे संयोजक डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ९ ते १५ जुलै या कालावधीत वारीच्या मार्गावर वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने या औषधवारीचे आयोजन केले जाते. 

आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या काेनाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ पासून औषधवारीचे आयोजन केले जाते. यंदाचे हे ४२ वे वर्षे आहे. सुरुवातीला या वारीत पाचजणांची टीम होती. आता ती २५ जणांवर पोहोचली आहे. या औषधवारीच्या निमित्ताने एप्रिल महिन्यापासून औषधांचे वर्गीकरण ज्ञानदेव सेवा मंडळाच्या सभागृहात दर रविवारी केले जाते. 

या वारीत दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. दरवर्षीचा अनुभव पाहता यंदा औषधांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. डॉ. शुक्ल यांनी सांगितले की, यावर्षी २०० सलाईनच्या बाटल्या, १००० मलम, सध्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे त्यांना त्वचेचा संसर्ग होत असतो तो अनुभव पाहता १,५०० खाजेच्या ट्यूब जादा घेतलेल्या आहेत. या वारकऱ्यांना सेवा देत असताना जीवन सफल झाल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले. 

औषधवारीचा मार्ग खालीलप्रमाणे९ जुलै फलटण, १० जुलै वाजेगांव, ११ जुलै नातेपुते, १२ जुलै माळशिरज, १३ जुलै वेळापूर, १४ जुलै वाडी कुरोळी, १५ जुलै गादेगांव. 

ही टीम झाली सज्ज  डॉ. शुक्ल यांच्यासह डॉ. दिनकर गोड, डॉ. राजा इसरानी, डॉ. विश्वास खोडकर, डॉ. अजित गौड, डॉ. सुनील प्रजापती, डॉ. अजय तिवारी, उज्ज्वला पवार, अनिता काप, सुनील म्हात्रे, अविनाश मोहिते, गिरीश कुलकर्णी, विठ्ठल सकुंडे, निखिल चौधरी, शिवम गौड, ज्ञानेश्वर शिंदे, रेणुका शिंदे, अशोक घोलप, गीतांजली शिर्के, हेमा देशमुख, विद्या शुक्ला, अभय मराठे, स्वरांजली कारेकर, आदी मंडळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022