शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल अध्यापक निवृत्ती वय वाढले

By admin | Updated: February 11, 2015 06:24 IST

राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय, ३ दंत आणि ४ आयुर्वेदिक महाविद्यालयातील अध्यापकांचे नियत सेवानिवृत्तीचे वय ६३वरून ६४

मुंबई : राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय, ३ दंत आणि ४ आयुर्वेदिक महाविद्यालयातील अध्यापकांचे नियत सेवानिवृत्तीचे वय ६३वरून ६४ करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अध्यापकांचा तुटवडा जाणवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि आस्थापना मंडळामार्फत अध्यापकांची पदे भरण्यासाठी काही काळ लागणे अपरिहार्य आहे. तर अतिविशेषोपचार विषय व काही आरक्षित प्रवर्गांवर प्रयत्न करूनही पात्र उमेदवार उपलब्ध होत नाहीत. ही पदे रिक्त ठेवल्यास विद्यार्थी व रुग्णसेवा यावर विपरीत परिणाम होतो, ही बाब विचारात घेऊन अध्यापकांचे निवृत्ती वय वाढविण्यात आले आहे. ‘बांधकाम’च्या रोजंदार कर्मचाऱ्यांना सामावणारसार्वजनिक बांधकाम विभागात रोजंदारीवर असलेल्या कमर्चाऱ्यांना पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयामध्ये नियमित स्वरूपात सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फायदा २६ कर्मचाऱ्यांना होईल. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेली विद्युत निरीक्षणालय शाखा ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णयही घेण्यात आला.नंदुरबार न्यायालयांसाठी १२ नवी पदे नंदुरबार येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायालय व मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयांकरिता १२ नवीन पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या न्यायालयांची कामे पूर्ण क्षमतेने सुरू होतील. या नवीन पदांकरिता वेतन व भत्त्यासाठी सुमारे ६५ लाख ४० हजार तसेच न्यायालयाचे संगणकीकरण व इतर पायाभूत सुविधांसाठी सुमारे ६१ लाख ७६ हजार रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)