शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वैद्यकीय परीक्षांचा निर्णय आठवड्याभरात अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 19:21 IST

पुढील आठवड्यात किंवा मे अखेरपर्यंत परीक्षा बाबतचा निर्णय विद्यार्थ्यांना कळविला जाईल.

ठळक मुद्दे विद्यापीठातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार

पुणे: राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून या परीक्षा संदर्भातील निर्णयाबाबत केंद्रीय परिषदांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पुढील आठ ते दहा दिवसात त्यावर मार्गदर्शक सूचना येणे अपेक्षित आहे, असे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.मोहन खामगावकर यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठ अपवाद नाही. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे पुढील वेळापत्रक राज्य शासन, संस्था प्रमुख ,प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून ठरविले जाणार आहे. तसेच केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून वेळापत्रक निश्चित केले जाणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे. डॉ.मोहन खामगावकर म्हणाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आरोग्य विभागाला विविध पातळ्यांवर मदत करत आहेत. तसेच सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नाही. त्याचप्रमाणे परिक्षांसंदभार्तील निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय परिषदांना आहेत. त्यामुळे विद्यापीठातर्फे केंद्रीय परिषदांची संवाद साधला जात असून परीक्षांबाबत शिथीलता देणे शक्य आहे का? यासंदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. केंद्रीय परिषदांकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठातर्फे परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल.--------------- विद्यापीठातर्फे डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी  समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून केंद्रीय परिषदांकडे परीक्षा संदर्भातील संवाद सुरू आहे. पुढील आठवड्यात किंवा मे अखेरपर्यंत परीक्षा बाबतचा निर्णय विद्यार्थ्यांना कळविला जाईल.- डॉ दिलीप म्हैसेकर,कुलगुरू आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थीMedicalवैद्यकीय