चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी

By Admin | Updated: January 23, 2017 04:06 IST2017-01-23T04:06:03+5:302017-01-23T04:06:03+5:30

पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबुलाल चव्हाण सध्या अमृतसर येथे आहेत. तेथे सैन्याच्या नियमानुसार

Medical examination of Chandu Chavan | चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी

चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी

धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबुलाल चव्हाण सध्या अमृतसर येथे आहेत. तेथे सैन्याच्या नियमानुसार त्यांची सर्व आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तीन ते चार दिवसांनी ते गावाकडे येऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी रविवारी धुळ्यात दिली़
चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी रविवारी डॉ़ भामरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. चंदू बोरविहीरला कधी येणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे़ चंदू चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर डॉ़ भामरे यांनी बोरविहीर येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चंदूला नक्की परत आणू, असे आश्वासन दिले होते़
चंदू यांचे मोठे बंधू भूषण आणि आजोबा चिंधा पाटील यांनी रविवारी सकाळी धुळ्यात डॉ. भामरे यांची भेट घेतली. त्या वेळी बोरविहीर येथील युवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदूच्या सुखरूप परतीबद्दल दिलेला शब्द आपण पाळला. आपण पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांशी आठवड्यात दोनदा बोलायचो; तसेच संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांच्यावर दबाव निर्माण केल्यामुळेच हे होऊ शकले, असे भामरे यांनी सांगितले. आपण अमृतसरलासुद्धा जाऊन चंदूची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Medical examination of Chandu Chavan