शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी जेलमध्येच उपलब्ध होणार वैद्यकीय उपकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 18:50 IST

राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आणि कच्चे कैदी असलेल्या बंदीजनांना दिलासा देणारी एक बाब आहे. विविध विकाराबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साहित्याची उपलब्धता आता कारागृहातच केली जाणार आहे.

 - जमीर काझी मुंबई  - राज्यातील विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आणि कच्चे कैदी असलेल्या बंदीजनांना दिलासा देणारी एक बाब आहे. विविध विकाराबाबत निदान करणारी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व साहित्याची उपलब्धता आता कारागृहातच केली जाणार आहे. त्यामुळे निदानात होणाऱ्या विलंबामुळे कैदी दगावणे, प्रकृती बिघाडाच्या प्रकाराला आळा बसणार आहे."वैद्यकीय उपकरणाच्या उपलब्धतेमुळे कैद्यांना तपासणीसाठी कारागृहातून ने-आण करणे, त्यांची सुरक्षा आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळाचा प्रश्न निकालात लागणार आहे. बंद्यांच्या वैद्यकीय सोई सुविधेत वाढ करण्यासाठी तब्बल २० लाख ८८ हजार रुपये किंमतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. लवकरच विविध स्तरावरील कारागृहात ही उपकरणे उपलब्ध केली जातील, असे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले. तळोजा कारागृहातील कैदी जोरावर सिंहला झालेल्या मारहाण व त्याच्यावरील उपचारावरील दिरंगाईबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याने कारागृह प्रशासनाकडून सोईसुविधाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.राज्यातील बहुतांश जेलमध्ये क्षमतेच्या जवळपास दिडपट कैदी आहेत. त्यामध्ये सिद्ध दोष बंद्यापेक्षा न्यायाधीन कैद्यांची संख्या अधिक आहे. या सर्वांना तपासण्यासाठी जेलमध्ये वैद्यकीय अधिकारी असतो, त्याच्याकडून कैद्यावर प्राथमिक उपचार केला जातो. मात्र त्याठिकाणी प्राथमिक तपसाणीसाठी आवश्यक असणारी यंत्रे,उपकरणाचा अभाव आहे. त्यामुळे एकतर कैद्यावरील आजारावर तातडीने निदान केले जात नाही. किंवा त्याला अन्य शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी न्यावे लागते.त्यामुळे कैद्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. त्यामुळे आता पल्स ऑक्सिमिटर, डिजीटल स्टेथोस्कोप, डिजीटल मायक्रोस्कोप,ईसीजी मशीन, स्ट्रेचर , रिशूसेशन किट , मल्टीपल मॉनिटर, पेशंट ट्रॉली, ड्रेसिंग ट्रॉली आॅपरेशन टेबल,आदी साहित्याची खरेदी करणार आहे. महाराष्ट्रात एकुण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ,ब, क व ड या चार स्तरावर ४५ असे एकुण ५४ कारागृह आहेत. त्याची अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी असलीतरी प्रत्यक्षात ३१ हजार २१८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २१ हजार ८३३ पुरुष तर १३८५ महिला कैदी आहेत. जेलमधील बंदी क्षमता २३९४२,  प्रत्यक्ष बंदीची संख्या ३१२१८  

टॅग्स :jailतुरुंगMaharashtraमहाराष्ट्र