शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी हवेे ‘एमबीबीएस’ डॉक्टरांचेच प्रमाणपत्र, ‘आरटीओ’चा कारभार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 05:35 IST

RTO administration online : वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल, तर आता  ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांचेच ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर : घरबसल्या केव्हाही ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. आरटीओचा सर्व कारभार ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शनिवारी सोलापुरात बोलताना दिली. वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा नूतनीकरण करायचे असेल, तर आता ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांचेच ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर नागज फाट्याजवळ आरटीओ चेकपोस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त डॉ. ढाकणे सोलापूर दौऱ्यावर आले होते. शनिवारी शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आरटीओचा कारभार ऑनलाइन होत असल्याची माहिती दिली. आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करण्याचे नियोजन सुरू आहे. नवीन खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी आता थेट वितरकामार्फत ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचला आहे. वाहनाला नोंदणीवेळेस थेट क्रमांक दिला जात आहे. मालवाहू वाहनांचीच तपासणी करून नोंदणी केली जात आहे.येत्या काळात घरबसल्या कोणालाही व कधीही लर्निंग लायसन्स काढता येईल. राज्यात दरवर्षी २० लाख लोकांचे लर्निंग लायसन्ससाठी अर्ज येतात. लायसन्ससाठी ४० वर्षांपुढील व्यक्तींना डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. आरटीओ कार्यालयाजवळ बसलेले डॉक्टर शेकडो प्रमाणपत्रे देत होते, पण आता एमबीबीएस डॉक्टरांचे ऑनलाइन प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी डॉक्टरांना नोंदणी क्रमांक दिला जाईल व एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्रे देता येतील. हायसिक्युरिटी नंबरप्लेटवाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी आधार नंबर गरजेचा असून, नंबरप्लेटवर याची नोंद होते. त्यामुळे अपघातात पळून जाणाऱ्या वाहनांचा शोध घेता येणार आहे. अपघात सुरक्षेसाठी अशा नंबरप्लेटची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल नंबर बदलण्याची सोयवाहन नोंदणी करताना मोबाइल नंबर देणे गरजेचे आहे, पण काही जण नंबर देत नसल्याने वितरक स्वत:चा नंबर देऊन वाहन नोंदणी करतात. पुढे वाहन मालक सिम कार्ड बदलतात. पोलिसांची कारवाई ऑनलाइन सुरू झाली आहे. नंबरप्लेटचा फोटो काढून दंड केला जातो, पण याचा एसएमएस आला नाही, तर वाहन मालकांचा दंड वाढत जातो. त्यामुळे ऑनलाइन मोबाइल नंबर अपडेट करण्याची वाहन व सारथी सॉफ्टवेअरमध्ये सोय केली आहे.

स्कूलबस चालकांचा प्रस्तावकोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने रिक्षा व्यवसाय बंद पडला होता. त्यामुळे परमिटधारकांना दीड हजार अनुदान देण्यात आले. स्कूलबस भाडेकरूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मागणीआधीच नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAutomobileवाहन