महापौर मॅरेथॉन खड्डय़ातून?

By Admin | Updated: August 22, 2014 23:18 IST2014-08-22T23:18:38+5:302014-08-22T23:18:38+5:30

रौप्य महोत्सवी महापौर वर्षा मॅरेथॉनच्या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश महापौरांनी दिल्यानंतर आता ते बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

Mayor marathon pit? | महापौर मॅरेथॉन खड्डय़ातून?

महापौर मॅरेथॉन खड्डय़ातून?

अजित मांडके- ठाणो
रौप्य महोत्सवी महापौर वर्षा मॅरेथॉनच्या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश महापौरांनी दिल्यानंतर आता ते बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या स्पर्धेनंतर चार दिवसांनीच गणरायाचे आगमन होणार आहे.  नऊ प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रत सध्या 1क्,742 स्क्वेअर मीटरवर 1646 खड्डे असून त्यावर केवळ तात्पुरत्या स्वरूपात खडीकरणाचे काम केले. परंतु, पावसात ही खडी पुन्हा उखडल्याने गणरायाचे आगमन या खड्डय़ांतूनच होणार असल्याचे या निकृष्ट कामावरून स्पष्ट झाले आहे.
ठाणो महापालिका दरवर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांसाठी कोटय़वधींचा निधी खर्च करते. तरीदेखील रस्त्यांवर खड्डे पडतच आहेत. पावसाळ्यात पडणा:या खड्डय़ांसाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय 25 लाखांची तरतूद केली असून एकूण सव्वादोन कोटींचा निधी वर्षभरासाठी खर्च होणार आहे. आता पावसाळ्यात पडलेल्या खड्डय़ांसाठी एक कोटीच्या आसपास निधी खर्च करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावरील खड्डे डांबरीकरणाच्या माध्यमातून बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारपासून वर्तकनगर भागातील खड्डे डांबरीकरणाने बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र, आजघडीला नऊ प्रभाग समित्यांत 1क् हजार 742 स्क्वेअर मीटरवर 1642 खड्डे असून यातील 7 हजार 438 स्क्वेअर मीटरवरील खड्डे खडीकरणाच्या माध्यमातून बुजवणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. उर्वरित 33क्4 स्क्वेअर मीटरवरील खड्डेसुद्धा खडीकरणाने बुजवल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी पावसाळ्यात पुन्हा खडी उखडल्याने सर्वच 1क् हजार 742 स्क्वेअर मीटरवरील खड्डे नव्याने बुजवण्याचे धोरण पालिकेने आखले असून आता  डांबरीकरण आणि काही ठिकाणी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून ते बुजवले जातील, असे पालिकेने स्पष्ट केले. केवळ पावसाळा होता म्हणून खडीकरणाचा तात्पुरता मुलामा दिल्याचे पालिकेने सांगितले असून आता पुन्हा याच कामासाठी पालिका अतिरिक्त निधी खर्च करेल.
नऊ प्रभाग समित्यांत हे खड्डे असून सोमवारपासून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेणार असून 28 तारखेर्पयत चकाचक रस्ते मिळणार असल्याचा पालिकेचा दावा आहे.
 
ठाणो महापालिका हद्दीत 356 किमीचे रस्ते असून त्यातील 75.क्3 किमी रस्ते यूटीडब्ल्यूटी तसेच काँक्रिटीकरणाच्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. अद्याप 281 किमीचे रस्ते डांबराचे आहेत.
 
च्शहरात हे खड्डे असतानाच मलवाहिन्या टाकण्यात आलेल्या भागांतही रस्त्यांवर खड्डे पडले असून याच मुद्दय़ावरून गुरुवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. नितीन कंपनी ते इंदिरानगर या मार्गावर मोठय़ा प्रमाणात रहदारी असते.
 
च्रामचंद्रनगर, महात्मा फुलेनगर, यशोधननगर आणि इंदिरानगर या परिसरात जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर असल्याने या भागातील नागरिक या मार्गाचा वापर करतात. परंतु, येथे मलवाहिन्या टाकण्यात आल्यानंतर येथील रस्त्यांचे काम करण्यात आले होते. परंतु, आज हा रस्ता पुन्हा उखडला असून या रस्त्याची चाळण झाली असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला आहे.
 
च्स्टेशन रोड, स्टेडिअम, कळवा ब्रिज, जुना बेलापूर रोड, मुंब्रा-कौसा परिसर, वंदना सिनेमा, राममारुती रोड, वागळे इस्टेट, सावरकरनगर, तीनहात नाका, कॅडबरी, वर्तकनगर, माजिवडा, कापूरबावडी, बाळकुम, कॅसल मिल आदींसह शहरातील इतर महत्त्वाची ठिकाणो ही सध्या खड्डय़ांनी व्यापली आहेत. 
 
च्त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. तीनहात नाका परिसरात तर सिग्नल सुटल्यानंतर गाडय़ांचा वेग मंदावल्याचे दिसून येते.

 

Web Title: Mayor marathon pit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.