बीसीसीआय शिबिरासाठी माया सोनवणे, मुर्तुझा ट्रंकवालाची निवड

By Admin | Updated: May 7, 2014 02:26 IST2014-05-07T01:30:34+5:302014-05-07T02:26:25+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने पश्चिम विभागीय १९ वर्षाखालील खेळाडंूच्या सराव शिबिरासाठी नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला आणि माया सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

Maya Sonawane, Mortuja Trunkwala's selection for BCCI camp | बीसीसीआय शिबिरासाठी माया सोनवणे, मुर्तुझा ट्रंकवालाची निवड

बीसीसीआय शिबिरासाठी माया सोनवणे, मुर्तुझा ट्रंकवालाची निवड

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने पश्चिम विभागीय १९ वर्षाखालील खेळाडंूच्या सराव शिबिरासाठी नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला आणि माया सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
मुर्तुझा ट्रंकवाला नाशिक जिल्हा संघाचा सलामीचा फलंदाज असून, तो गेल्या वर्षी महाराष्ट्र संघात सहभागी होता, तर नुकत्याच झालेल्या निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतही त्याने चमकदार कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांची सदरच्या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिकच्या महिला संघातील माया सोनवणे हिनेही महाराष्ट्र संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. माया सोनवणे ही सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू असून, दोन्ही खेळाडूंची बीसीसीआयच्या सराव शिबिरात प्रथमच निवड झाली आहे.

 

Web Title: Maya Sonawane, Mortuja Trunkwala's selection for BCCI camp