शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 06:25 IST

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे  माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबई : महाविकास आघाडीची मागील आठवड्यात थांबलेली विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा गुरुवारी पुन्हा सुरू झाली. आतापर्यंत एकूण २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले असून यातील १०० जागा काँग्रेसला, तर उद्धव सेना आणि शरद पवार गटाला प्रत्येकी ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित २८ मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या असून त्यावर दोन पक्षांनी दावा सांगितल्याने तो तिढा कायम असल्याचेही सांगण्यात आले. येत्या दोन दिवसांत जागा वाटप पूर्ण करून ते जाहीर करण्यावरही बैठकीत एकमत झाल्याचे  सूत्रांनी सांगितले.

आधी निकाल बघू, मग मुख्यमंत्री ठरवू !महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार, हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे  माध्यमांशी बोलताना सांगितले.

४० जागांवरचा पेच मिटला... आता उरल्या २८ जागामागील दीड महिन्यांपासून मविआतील जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मागील आठवड्यात २२० जागांपर्यंत वाटप पूर्ण झाले होते. गुरुवारी सुरू झालेल्या चर्चेत उरलेल्या ६८ जागांवर चर्चा सुरू झाली. त्यापैकी ४० जागांवरील तिढा सोडवून त्या जागांचे वाटप करण्यात आले.  उरलेल्या २८ जागांवरील तिढा कायम आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमधील जागा असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

चोकलिंगम यांना भेटणार शिष्टमंडळमविआचे शिष्टमंडळ शुक्रवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना भेटणार आहे. मतदान यादीतील संदिग्धता, मतदान व्यवस्थित होण्यासाठी केलेले उपाय, मतदान केंद्रावर मतदारांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या काही मागण्या मांडणार आहे.

आतापर्यंत झालेल्या जागा वाटपाची यादी काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे, शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना पाठवली जाईल. आता उरलेल्या जागांचा तिढा हे वरिष्ठ नेते चर्चा करून सोडवतील. दोन दिवसांत सर्व जागांची घोषणा आम्ही करू. - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

समाजवादी पार्टीला हव्यात १२ जागा -- मुंबई : मविआतून समाजवादी पार्टीला १२ जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी केली आहे. - काँग्रेसने समाजवादी पार्टीला विश्वासात घेतल्याशिवाय परस्पर आपल्या जागावाटपाची घोषणा करू नये. मतविभाजन टळावे हीच आमची इच्छा आहे. हरयाणात मतविभाजनाचा फटका बसला नसता तर काँग्रेसला जिंकणे शक्य होते, याची आठवणही आझमी यांनी करून दिली आहे. - महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र समाजवादी पार्टीला सोबत घेणार की नाही याची स्पष्टता झालेली नाही.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे