सोलापूरमधील दुधणी स्थानकाजवळ घसरले मालगाडीचे डबे

By Admin | Updated: May 1, 2017 09:18 IST2017-05-01T07:21:08+5:302017-05-01T09:18:43+5:30

सोलापूर विभागातील दुधणी रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीला अपघात झाला आहे.

Maulage coaches near Solapur | सोलापूरमधील दुधणी स्थानकाजवळ घसरले मालगाडीचे डबे

सोलापूरमधील दुधणी स्थानकाजवळ घसरले मालगाडीचे डबे

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 1 - सोलापूर नजिक मालगाडीच्या इंजिन सहित ५ डबे घसरले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातली वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुधनी स्थानकावर हे डबे घसरले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास रात्री 12.30च्या वाजता झालेल्या या अपघातात मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसले असून, त्यामुळे वाडी-लातूर - मनमाड या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सुमारे 12 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

दुधनीनजिक रुळांना तडे गेल्याने दक्षिण भारतात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दक्षिण भारताचा संपर्क तुटला आहे. वाडी जंक्शन वरुन होटगी स्थानकाकडे ही मालगाडी येत होती गाडी. यामध्ये सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल घेऊन ही मालगाडी येत होती. दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती उप रेल्वे प्रबंधक राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे. 
 

Web Title: Maulage coaches near Solapur